September 2023
नमस्कार, बिइंग वूमनच्या या नव्या अंकात सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. ऑगस्ट महिना सर्व भारतीयांच्या आयुष्यातला सोनेरी महिना म्हणून ओळखला जाईल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारताने नवा इतिहास रचला आहे. महिलांचा या कार्यात सिंहाचा वाटा आहे. भारतीय असल्याचा अभिमान आणि या यशाबद्दल भरभरून वाचायला, पाहायला, ऐकायला मिळाले. जागतिक दर्जावर बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या १६ वर्षाच्या मुलाने अभूतपूर्व कामगिरी करत यश संपादन केले. नीरज चोपराने IAAF जागतिक अॅथेल्टीकस चॅम्पियन स्पर्धेत अव्वल कामगिरी करत ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळविला आहे. भारत देशाची ही दैदिप्यमान कामगिरी बघितली की आपला देश महासत्तेच्या दिशेने एकएक पाऊल पुढे जात आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
बिइंग वुमनने महिलांच्या आग्रहामुळे आयोजित केलेला मंगळागौर खेळांचा इव्हेंट खूप दिमाखात पार पडला. आपले पारंपरिक खेळ आठवणीत रहावेत आणि त्यातून पुढील पिढीपर्यंत पोहोचावे म्हणून हा सगळा अट्टाहास. एक संध्याकाळ सर्वांनी स्वतःसाठी व्यतीत केली. जागेच्या मर्यादेमुळे अनेक महिलांना ‘आता जागा नाही’ असे सांगावे लागले. ‘खेळ खेळू मंगळागौरीचे’ असा प्रयोग करणारी Being Woman पहिलीच संस्था ठरली आहे. बिईंग वूमन नेहमीच परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालते. नुकतीच बिझिनेस वूमनची मीटिंग पार पडली. कात्रज येथे मंगळागौरीच्या खेळांचा दुसरा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यातही ८० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. बिईंग वूमन सर्व वयाच्या स्त्रिया, गृहिणी, लेखिका व व्यावासायिक अशा सर्वांना मदत करतच असते आणि नेहमीच करत राहील.