पर्यावरणस्नेही स्वागत गणरायाचे
नानाविध धर्म, पंथ, भाषा, चालीरीती आणि परंपरा समाविष्ट असलेल्या आपल्या भारत देशाची ‘विविधतेतील एकता’ ही अखिल जगामध्ये कौतुकास्पद ठरणारी वैशिष्ट्यपूर्ण अशी प्राचीन भारतीय संस्कृती आहे. आपल्या देशात विविध धर्मांमध्ये ऋतुप्रमाणे महिना आणि तिथीनुसार सण व उत्सव साजरे करण्याची फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे.