आता आपल्याला आकाशातले दोन ठळक तारका समुह माहिती झाले आहेत सप्तर्षी आणि शर्मिष्ठा. त्यातल्या सप्तर्षींची शेपुट धरून आपल्याला पुढचे बरेच तारका समुह माहिती करून घेतायेतात. सप्तर्षींची शेपुट तशीच गोलाकारात पुढे वाढवली की एक तेजस्वी तारा लागतो, तो म्हणजे स्वाती. त्याचे पाश्चात्य नाव Arctrus. स्वाती तारा टोकाला समजून त्या गोलाकाराच्या स्पर्ष रेषेच्या (टँजटच्या) दिशेने गेल्यास एक लांबट आडवा चौकोनी आकाराचा तारका समुह लागतो. त्याचा आकार खरेतर आडव्या आईस्क्रिमच्या कोनसारखा असतो. त्याचे नाव भूतप , पाश्चात्यनाव Bootes असेआहे.
भूतपाच्या खालच्या बाजूला एक खूप सुंदर अतिशय देखणा असा तारकासमुह आहे त्याचे नाव Corona Borialis असेआहे. त्याचा आकार एखाद्या मुकुटा सारखा आहे. ऱाणीचा रत्नजडित मुकुट.
आपण सप्तर्षिंची शेपूट धरून भूतपापर्यंत पोहोचलो होतो त्याच्या खालचा ऱाणीचामुकुटपण (कोरोनाबोरिऍलिस) बघितला. आतापरत तीच शेपुट धरून अजून पुढे गेलो की परत एक तेजस्वी तारा दिसतो, तो म्हणजे चित्रा (स्पायका). हा चित्रा तारा मुळाशी पकडून वर चढलोकी आईस्क्रिमच्या कपा सारखा आकार दिसतो, ती आहे कन्या रास (व्हर्गो ). या कन्येच्या कपा सारख्या आकारामध्ये असंख्य एमआॅब्जेक्टस्आहेत. तो चित्रा ताराहा (eclipsing binary) पिधानकारी रुप विकारी प्रकार चाव्दैती तारा आहे.
आता स्वाती आणि चित्रा या दोन ताऱ्यांना जोडणारी रेषा पाया धरून भूतपाच्याविरूध्द बाजूला एका काटकोन त्रिकोणाची कल्पना केली तर त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या कोनापाशी एक अंधुकसा तारका समुह आहे, त्याचे पाश्चात्यनाव ” कोमाबेरेनिसिस ” . ” बेरिनिस ” ही इजिप्तचा राजा तिसरा ” टॉलेमी ” याची रूप सुंदर राणी. तिच्या सौंदर्याचे मुख्य कारण म्हणजे तिचे रेशमी सुंदर केस. टॉलेमीहाइ. स. पूर्व ३ऱ्या शतकात इजिप्तचा फारोह होता. टॉलेमी एक दासी रियाच्या स्वारीवर निघाला होता ती मोहिमतशी अवघड आणि जिवावर बेतू शकेल अशी होती. राणीने काळजी तपडून देवाला नवसकेला , पति सुखरूप परत आला तर मी माझे सुंदर केस तुला अर्पण करीन. राजा सुखरूप परत आला. राणीने बोलल्या प्रमाणे आपले केस देवाला अर्पण केले. ते देवळात ठेवलेले केस दुसर्या दिवशी देवळातून गायब झाले. त्यात बहुतेक देवळाच्या पुजाऱ्याचा हात असावा. त्याला वाचवण्यासाठी म्हणून राज ज्योतिषाने राजाला पटवलेकी राणीने अर्पणकेलेली भेट देवांना एवढी आवडलीकी देवांनीती आपल्या बरोबर स्वर्गात नेली अशा रितीने राणीच्या केसांना आकाशात स्थान मिळाले ” कोमाबेरेनिसिस ” म्हणजेच ते बेरेनिस राणीचे केस. राणी नाहीतर नाही तिचे नुसते केसच बघून घ्या.
चित्रा ताऱ्यावरून कन्या राशीच्या पुढे उजव्या हाताला एक शंकरपाळ्या सारखा आकार दिसतो. ते म्हणजे हस्तनक्षत्र. त्याचे पाश्चात्यनाव corvus म्हणजे ग्रीक वाड्:मयात ” कावळा “. आपल्या डाव्या हाताचा तळवा पालथा ठेवला तर प्रत्येक बोटाच्या टोकावर एक आणि मनगटावर एक असे सहातारे दिसतील. करंगळी आणि तिच्या जवळचे बोट या दोन ताऱ्यातील अंतर कमी आहे तर अंगठा आणि त्याच्या जवळचे बोट यातील अंतर जास्तआहे. प्रत्यक्षातही तसेच असतेना. आपल्या पूर्वजांच्या निरीक्षणाला दाद दिली पाहिजे.
Corvus च्या पुढेच त्याला लागून असलेला तारका समुह म्हणजे crater म्हणजे ” चषक “. चषकाच्या खालच्या बाजूला “Hydra” ” वासुकी” नावाचा तारका समुह आहे. या तिघांच्या संबंधी एक आख्यायिका ग्रीक वाड्:मयात आहे.
कावळा म्हणे प्रथम पांढरा होता आणि तो सूर्यदेव अपोलोचा लाडका होता. एकदा ज्युपिटरला अर्पण करण्यासाठी पाणी आणण्याची आज्ञा या कावळ्यालाकेली गेली. पण त्याने चावटपणा करून पाणी आणायच्या ऐवजी पंजात साप धरून आणला आणि बऱ्याच खोट्या नाट्या गोष्टी सांगितल्या. म्हणून देवांनी शिक्षा म्हणून कावळा, पाण्याचे भांडे म्हणजे तो चषक आणि वासुकी साप या सगळ्यांना आकाशात स्थिर करून टाकले. कावळ्या ला काळा करून टाकले आणि त्याने त्या चषकातले पाणी पिऊ नये म्हणून सापाला लक्ष ठेवायला सांगितले. आपल्या भारतीय पुराण कथांना कोणी नावे ठेवायला नको, ग्रीक, रोमन पुराण कथाही तितक्याच भन्नाट आहेत.
जलप्रलयानंतर ” नोहाने ” आपल्या नौकेतून आणलेला कावळा तो हाच असे एका कथेत सांगितले आहे.
भारतीय पुराणात या भागातील अनेक तारका समुह मिळून प्रजापतीची आकृती दाखवली जाते. त्या प्रजापतीचा हात म्हणजे हे हस्तनक्षत्र.
आकाशदर्शनाला उपयोगी पडावी अशी एक पध्दत आकाश निरीक्षकांतर्फे वापरण्यात येते ज्या योगे कुठला तारा किंवा तारका समुह कुठे बघायचा ते समजते. तीपध्दत अशी. समजा एखादा तारा, उदाहरणार्थ व्याध आपल्याला माहिती आहे. तर तो व्याध तारा घड्याळाच्या मध्य भागी समजून १ वाजण्याच्या स्थितीला अमुक ताराआहे, ३ वाजण्याच्या स्थितीला अमुकतारा आहे असे सांगितल्यास बघणार्याला तो शोधणे सोपे जाते. तेव्हा आता इथुन पुढे आपणहीच पध्दत वापरूया.
लीनादामले.