Music Therapy
डॉ. संगीता सांगवीकर यांच्या म्युझिक थेरपी या सेशनमुळे संगीत हे मानसिक आरोग्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम आहे याची सुंदर जाणीव माईंडफूल शाँटझ् च्या सेशनमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना झाली.
मेंदूला उत्तम संगीत ऐकण्याची सवय करून दिली तर आयुर्वेदाच्या अभ्यासाने ब्लड प्रेशर,डायबेटिस, संधीवात, सायटिका यांसारख्या प्रदीर्घ आजारांवर सुध्दा संगीत उपचार पध्दत उपयोगी ठरू शकते हे डॉ. सांगवीकर यांनी छान समजावून सांगितले.
तसेच भारतीय शास्त्रीय संगीतातील काही रचना सतारीवर प्रत्यक्ष वाजवून डॉ. सांगवीकर यांनी संगीतातील प्रत्येक स्वराची अशी एक विशिष्ट वेळ आणि लहेजा असतो जो कळत नकळत आपल्या मनावर नक्कीच काम करत असतो याची उत्तम माहिती प्रात्यक्षिकासह करून दिली.
संगीत आणि आपले मन याचा किती जवळचा संबंध आहे याची डॉ. संगीता सांगवीकर यांनी सुरेल शब्दात जाणीव करून दिल्यामुळे सेशनला उपस्थित सर्व सदस्य खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध झाले असे नक्कीच म्हणता येईल.