मराठेज मध्ये प्लेसमेंट बघता बघता एक दिवस मी बघितलं तर आम्ही चार पाच मुलांना मी आशिया टेलिव्हिजन नेटवर्क नावाची एक कंपनी होती आणि तिथे मी मुलांना पाठवलं होतं आणि तिथे जनरल मॅनेजर होते प्रदीप दीक्षित ते आमच्या ओळखीचे होते ते जे जे मध्येच राहायचे आमच्या एका कलीगचे मिस्टर होते. आमच्याकडे आले होते आणि मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे आमच्या इन्स्टिटयूट ची मुले नोकरीला जातात तर ते म्हणाले तुम्हाला हवी एका नोकरी तिथे? मी म्हटलं हो चालेल ना कारण असा होता तेव्हा मास मीडिया कम्युनिकेशन किंवा हे कुठलीच कोर्सेस नव्हते डायरेक्टली तिथे जॉब मिळायचा तर मी त्यांना म्हटलं की मला चालेल मला आवडेल मग त्यांनी मला सांगितलं तुम्हाला एवढा पगार मिळेल तर मी खूपच आनंदून गेले कारण हा जो पगार होता पहिल्याच्या तिप्पट होता. दुसरे दिवशी मी आणि अरुण पार्ल्याच्या ऑफिस ला गेलो सकाळी १० वाजता ऑफिस सुरु होण्याच्या वेळेला तर ऑफिस मध्ये कोणीच नव्हते एक ऑफिस बॉय ला विचारले बाबला बॅनरजी म्हणून एवढ्या लवकर येत नाहीत मी म्हटलं आता काय कधी येतात ते त्यामुळे एक-दीडच्या पुढे येतात ते तिथे मी बसले मग अरुण ला म्हणलं तू जा घरी मी थांबले मग जरा पुढे गेल्यावर ती एक मुलगी आणि एक जण होते नंतर कळले ती एस्टर माझी मैत्रीण झाली , आणि सलीम भाई कॉम्प्युटरवर काम करत बसलेले. त्या ऑफिस मध्ये कॉम्प्युटर ठेवलेले, खुर्च्या, प्रत्येकाला खूप छान होतं नंतर मी थांबले तिथे मग बाबला आले ओळख करून दिली मग मला टी सिरीज च्या ऑफिस शी कॉ ऑर्डीनेट करायचा आहे असे सांगितले मग मी आणि बाबला त्या ऑफिस गेलो .ते भव्य ऑफिस,रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रथमच पहिले ,मी एकदम भारावून गेले तिथे खूप जणांची ओळख झाली आता माझ्यशी कॉओर्डीनेट करायचे. ही तू मला आता बाकीचे काम समजावून सांगेन त्यामुळे माझा पहिला दिवस खूप भारी होता . पंचवीस-तीस वर्षांपूर्वी ती सुद्धा खूपच भारी होतं. दुसऱ्या दिवशी मी बरोबर दहा वाजता ऑफिसला पोहोचले कारण टाइमिंग मला माहिती नव्हतं मी गेल्यानंतर मग ऑफिसला मला कळलं की टाइमिंग अकरा वाजता आहे सगळेजण अकराच्या पुढे येतात मी म्हटलं ठीक आहे मला तर खूप लांब यायचं होतं जे जे हॉस्पिटल वरून येण म्हणजे मला दोन वेळा ट्रेन बदलायाला लागायची, भायखळा दादर ,दादर ते पार्ला . तेव्हा मला हा जॉब आवडलेला होता. मग हळूहळू आमच्या इथे बरीच लोक जॉईन झाली . कॉम्प्युटर मध्ये कॅसेट्स प्रोग्रॅम होता,तो कसा वापरायचा , काय काय करायचं अर्थ स्टेशनला जी मुलं असायची त्यांना काय काय इंफॉर्मेशन पाठवायची, आधी यु-मॅटिक कॅसट्स होत्या ,त्या गेल्या आव ऍडव्हान्स बीटा कॅसेट्स आल्या. एडिटिंग स्टुडिओ मध्ये दोन नवीन बीटा मशीन आली , मशीन वापरायला एडिटर होते आमच्याकडे त्या मशीन मध्ये गाणी तयार करायची कुठली गाणी घ्यायची त्यांचे पॅकेजेस तयार करायचे भक्ती गीत, रक्षाबंधनची गाणी, लोकगीत असं त्यानुसार आम्हाला आम्ही पॅकेजेस बनवायची आणि ती ब्रॉडकास्ट स्टेशनला पाठवायचं तर आमच्याकडे सिनेमा लिस्ट बनवायला लागायची . ते काम माझ्याकडे होते. आमच्याकडे फक्त दीडशे सिनेमे कॉन्ट्रॅक्ट केलेले होते त्याप्रमाणे ते सिनेमे लावायचे म्हणजे आज रात्री चा सिनेमा दुसऱ्या दिवशी दुपारी असायचा.शनिवार रविवार चांगले सिनेमे लावायचे , मग एक दिवस काय झालं 14 फेब्रुवारी ला मी असाच कुठलातरी सिनेमा लावलेला दो गज जमीन के नीचे नावाचा . सगळे आल्यावर विचारले कि हे काय उद्या काय माहित आहे का ? वॅलेंटाईन डे आहे रोमँटिक सिनेमा पाहिजे. खरंच तेव्हा या दिवसाचे फॅड नव्हते मग लगेच सिनेमा बदलायला सांगितला .आणि मटा मध्ये मी त्याच दिवशी वाचला होते असे खूप प्रसंग आले
त्यातून निभावून गेले .खरं तर कॉमन सेन्स मुळे . (क्रमश:)
त्यातून निभावून गेले .खरं तर कॉमन सेन्स मुळे . (क्रमश:)