‘कॅलिडिओस्कोप’
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥
लहानपणी हा श्लोक शिकवला जातो पण आपण जसजसे मोठे होत जातो तसे हळूहळू याचा विसर पडायला लागतो. घरच्यापेक्षा बाहेरच्या जेवणात अधिक गोडी वाटते किंवा महाराष्ट्रीयन जेवणापेक्षा फास्टफूडची अधिक रुची वाटू लागते.