Being Woman

Being Woman Diwali 2022

बिइंग वुमन मासिकाच्या या पहिल्या दिवाळी अंकात सर्वांचे मनापासून स्वागत. सर्वप्रथम बिइंग वुमनतर्फे सर्व वाचकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा.
हे वर्ष आमच्यासाठी खूप खास आहे. या वर्षांत अनेक नवीन बदल झाले आणि अनेक नवीन घडामोडी घडत बिइंग वुमन मासिकाच्या स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले. बघता बघता ३ वर्षांचा टप्पा बिडंग वुमन पार करून ४ थ्या | अमति पदार्पण करत आहे. आज मागे पाहताना घडलेल्या सर्व घटना डोळ्यासमोर स्वच्छ उभ्या राहतात, करोनाची २ वर्ष काढलेले डिजिटल अंक, त्यानंतर १५ ऑगस्ट पासून पुन्हा प्रिंट सुरु झाले. जाहिराती मिळवण्यासाठी पुन्हा सुख प्रयत्न आणि आता बदलेले मासिकाचे स्वरूप.वाचकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आणि आमच्या जाहिरातदारांनी आणि वर्गणीदारांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे हे सर्व सहज शक्य झाले,

मागच्या वर्षात दोन आगळे-वेगळे इव्हेंट झाले. कारवा नावाचे प्रदर्शन. यामध्ये फक्त महिला उत्पादकांचे स्टॉल होते. याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येक स्टॉल धारकाच्या प्रॉडक्टचा सेल झाला. प्रत्येक प्रॉडक्ट युनिक होते. कारण बनवणारी एक स्त्री होती त्यामुळे ऐश्वयांची डॅन्डमेड पॉटरी असो कि कल्याणीचे डॅन्डमेड मसाले आणि छोरी या अॅण्डची कुर्तीज असो सर्वांनाच चांगला बिझनेस मिळाला.
पुणे मेट्रोच्या गरवारे कॉलेज स्टेशन वर केलेले कुंकू छान पार पडले. २०० महिलांची उपस्थितां देशपांडे ‘ज किचन यांनी दिलेले खमंग तिळाचे लाडू, छोट्याशा भेटवस्तूंचे वाण या सर्व गोष्टीचे मेट्रो स्टेशन वर असलेल्या कर्मचान्यांनी कौतुक केले. नदनथदन आलेल्या सर्व महिलांच्या बोळक्यांमुळ स्टेशनवर एक चैतन्य होते.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *