Anxity
anxiety session
आपल्या प्रत्येकीलाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची काळजी वाटत असते पण जेव्हा या अती काळजीने आपले रोजचे जगणंसुध्दा अवघड होऊन जाते.. तेव्हा समजून जावे की,या काळजीचे चिंतेत(anxiety) रुपांतर झाले आहे. याच चिंतेवर, अतिरिक्त ताणातून मुक्त होण्यावर काम करण्याच्या हेतूने बिईंग वूमन आणि माईंडफूल शाँटझ् यांनी आजच्या या अनोख्या सेशन चे संयुक्त आयोजन केले होते.आपल्या मनातील ही काळजी वजा चिंता, नकारात्मक विचार, सतत जाणवणारी भीती, स्वतःचा अहंपणा हे शास्त्रशुध्द योगा व ध्यान-प्राणायाम यांच्या मदतीने कसे लांब ठेवता येईल याचे योगा अभ्यासक आदिती केळकर यांनी सहज शब्दांत मार्गदर्शन केले. तसेच समस्या छोटी असो किंवा मोठी त्याचे उत्तर हे आपल्याच पंचमहाभूतांच्या तत्वांमध्ये कसे दडले आहे हे माईंडफूल शाँटझ्च्या संस्थापिकांनी प्रात्यक्षिकासह उदाहरण देऊन उत्तम प्रकारे समजावून सांगितले. ताणतणाव आणि anxiety वर काम कसे करता येऊ शकते हे जाणून घेण्यासाठी या वेगळया सेशनला विविध वयोगटातील महिलांनी हजेरी लावत छान प्रतिसाद दिला.